Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सांगोला : कोळा येथे लग्नास नकार दिल्याने महाविद्यालयीन तरुणीचा खून

0 2,370

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोळा/प्रतिनिधी : लग्न करण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून संतप्त झालेल्या प्रियकराने हत्याराने तरुणीच्या गळ्यावर, डोक्यात, हातावर वार करुन तिचा खून केल्याची घटना ईराचीवाडी कोळा (ता. सांगोला) येथे शनिवार (ता.16) रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 


ऋतुजा दादासो मदने ( Rutuja Dadaso Mandane) (रा. ईराचीवाडी, कोळा, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मयत तरुणीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन मारुती गडदे (Sachin Maruti Gadade) (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


फिर्यादी पांडुरंग दाजीराम सरगर (Pandurang Dajiram Sargar) यांची बहिण सावित्रीबाई दादासो मदने ही तिच्या कुटुंबासह ईराचीवाडी कोळा (ता. सांगोला)येथे राहत आहे. फिर्यादीची भाची ऋतुजा दादासो मदने हिचा विवाह कोळा येथील समाधान कोळेकर यांचेबरोबर अडीच वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर ऋतुजा व समाधान कोळेकर याचा कोर्टातून घस्टफोट झाला आहे. ऋतुजा ही आईवडीलांसोबत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.


ऋतुजा हीचे लग्न होण्यापूर्वी गौडवाडी येथील सचिन मारुती गडदे याने तीचे लग्न होवू न देण्याचा प्रयत्न केला होता. माझेबरोबर लग्न झाले पाहिजे असे म्हणाला होता. दरम्यान ऋतुजा हीचा घटस्फोट झाल्यानंतर सचिन हा तिच्या संपर्कात आला होता. ते दोघेजण एकमेकाना भेटत असताना लग्न करण्यासाठी सचिन दबाव टाकत होता. सुरुवातीला ऋतुजा ही सचिनसोबत लग्नाला तयार होती परंतु घरच्यांनी लग्न थांबवले होते.


शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ऋतुजाची आई सावित्रीबाई मदने या दूध घालण्यासाठी डेअरीवर गेल्या होत्या. तर वडील दादासो मदने हे मुकबधीर आहेत. त्यावेळी ऋतुजा ही घरी एकटीच असल्याची संधी साधून सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याने घातक हत्याराने ऋतुजा हिच्या गळ्यावर, डोक्यात, हातावर वार करुन तिला गंभीर जखमी करून तिचा खून केला अशी फिर्याद मयत ऋतुजा हीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे. या खुनाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.