Latest Marathi News

BREAKING NEWS

 

मराठ्यांना आरक्षण अजूनही मिळाले नाही म्हणून 2 तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

0 253


धाराशिव : मराठा आरक्षणाची मागणी करीत दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ध्वजारोहण सोहळा सुरू असताना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली होती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही. सरकारच्या या भूमिकेविरूद्ध संताप व्यक्त करीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ध्वजारोण सोहळा सुरू असतानाच वनवास यात्रेचे संयोजक सुनील लागणे व प्रताप पाटील या दोघांनी अंगावर पेत्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेत त्यांना रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच सरकारने मराठा समाजाला आजवर गंडवण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वराजारोण सोहळ्याला पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.