देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या वाहतुक व विक्री सुरु असल्याच्या माहीतीवरुन पोलिसांची छापेमारी! तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; तर सहा जण ताब्यात
अकोला : सन उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात देशी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने रामदास पेठ, खदान, पातूर अशा विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली़ या छापेमारीत सहा जणांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे़ खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात नाजुकराव काकड रा़ अंबीका नगर यास ताब्यात घेउन त्याच्याकडून चार हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे़.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरात करण गवळी रा़ भीमचौक फाइल यास ताब्यात घेउन त्याच्याकडून देशी व विदेशी दारुच्या साठयासह ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर मालधक्का परिसरात छापा टाकून नरेश श्रीकृष्ण तेलगोटे यास ताब्यात घेउन त्याच्याकडून त्याच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़.
खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी परिसरात मराठा हॉटेलमधील प्रशांत उध्दव सोनोने रा़ धाबेकर नगर यास ताब्यात घेउन त्याच्या हॉटेलमधून ४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला़ त्यानंतर पातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिखलगाव येथे नंदकीशोर उर्फ नंदु सुभाष बरगे यास ताब्यात घेउन त्याच्याकडून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ तसेच वाडेगाव परिसरात बेलूरा येथील रहीवासी दिनेश देवालाल डाबेराव हा देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करीत असतांना त्याला ताब्यात घेउन देशी व विदेशी दारुसह साठा जप्त करण्यात आला़.