Latest Marathi News

BREAKING NEWS

 

खळबळजनक! सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी सेवा निवृत्त कर्मचाऱ्याला मागावी लागतेय भीक; वाचा काय आहे नक्की प्रकरण…

0 651

 

लोक रस्त्यावर अनेकदा भीक मागताना दिसतात. अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. एका निवृत्त झालेल्या व्यक्तीकडे भीक मागणं हा शेवटचा उपाय आहे. बेगुसरायच्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयाजवळ पॉवर हाऊस रोड, सदर ब्लॉक येथे राहणारे मोहन पासवान यांच्याकडे विभागीय अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांचा हक्क मिळवण्यात अपयशी ठरत आहेत.


सरकारी अधिकाऱ्याला देण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना दोन लाखांची लाच द्यायची आहे. मोहन पासवान हे हातात एक बोर्ड घेऊन बसले आहेत. ज्यावर जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी लाच मागत असून ते सेवानिवृत्त असल्याचं लिहिलं आहे. त्यांच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून त्यांना भीक मागावी लागते. सरकारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लाच मागितल्यामुळे भीक मागत असल्याचं मोहन पासवान यांच्या बोर्डवर लिहिलं आहे.


मोहन पासवान यांनी सांगितले की 1993 मध्ये रोलर ड्रायव्हर पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात जाऊन वेतनश्रेणीसाठी दरवाजा ठोठावला. न्याय मिळाला आणि आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने परवानगीही दिली. पण डीडीसी सुशांत कुमार यांनी अकाउंटेंट दया सागर यांना भेटण्यास सांगितलं.


अकाउंटेंटची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून वेतनश्रेणीचा लाभ मिळू शकला नाही. शेवटी आता लाच मागून दोन लाख रुपये जमा करत आहेत. भीक मागताना पाहून कोणीतरी अधिकारी त्यांची असहायता समजून घेईल, अशी आशा मनोज पासवान यांना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.