सध्या सोशल मीडियावर एक आणि तितकाच भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतून घरी परतणाऱ्या मुलींची दोन मुलांनी छेड काढल्यामुळे भयानक अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन शाळकरी सायकरवरुन घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील ओढणी ओढली. ज्यामुळे विद्यार्थीनीच्या सायकलचा तोल बिघडला आणि ती घसरून रस्त्याच्या मधोमध पडली, याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने मुलीला जोराची धडक दिल्यामुले तिचा मृत्यू झाला.
या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर अनेकांनी दोषी तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोन तरुणांना आणि तिला धडक देणाऱ्या बाईकस्वाराला अटक केली आहे.