Latest Marathi News

BREAKING NEWS

 

डेपोमध्ये बस धडकल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

0 541


मुंबई : मालवणीच्या गेट क्रमांक ८ जवळ असलेल्या डेपो परिसरात शनिवारी सकाळी फरहीन रिझवी (२०) या तरुणीचा बेस्ट बसच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणी चालक महादेव ससाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे

 

तो ही बस डेपोच्या आतमध्ये वळवत असतानाच फरहिन पुढच्या चाकात आली आणि गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वी एक गरोदर महिलादेखील अशाच प्रकारे गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी भाजी मार्केटच्या चार रांगांमुळे ग्राहकांची गर्दी होते आणि नेमकं चालायचं कुठून याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम उडतो.

तसेच पालिकेकडून सुरू असलेल्या कामांसाठी योग्य बॅरिकेटिंग नसून याठिकाणी सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेला नाही. त्यात दुप्पट तिप्पट अनधिकृत पार्किंगची भर पडते. या सगळ्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन बसचालकांना गाडी चालवताना अडथळा निर्माण होतो.

दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे घडला याचा तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.