माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : ज्यांना स्वतःच्या हिंमतीवर निवडून येत नाही याची जाणीव होताच, इतर ११ जणांचा संघ घ्यावा लागला.तेव्हा सत्तेचा बिगुल वाजला हे सत्ताधारी विसरले असून, केवळ सत्तेचा सोपान एकट्यानेच चढला असा भास करून घेत आहेत. परंतु त्यांना खुर्चीवर बसवणारे त्यांना निवडणुकीत मोठे वाटणारे व सत्तेच्या धुंदीमुळ छोटे वाटू लागलेले हळूहळू दुरावत चाललेत. पारदर्शी कारभार आहे तर विरोधात केवळ दोन संचालक असून त्यांना प्रोसिडींग देण्याची हिंमत व धमक का नाही तुमच्यात? याचाच अर्थ चेअरमनसह १९ संचालकांना ते भारी असून, सत्तेच्या धुंदीत असणाऱ्यांनी आजच्या हलगीनाद आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांनी धसका घेतला असल्याचे प्रतिपादन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व यु.टी. जाधव यांनी केले.
पुढे बोलताना यु.टी. जाधव म्हणाले, एका वर्षात सत्ताधारी यांनी नफ्यातील तीन कोटी २४ लाख रुपये हक्काची रक्कम हडपली असून, नोकर भरती करणार नाही असे सांगत नोकर भरती केली. त्याच प्रमाणे कर्मचारी यांना पगार बक्षीस देणार नाही असे सांगत, अहवालामध्य ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
ज्या शिक्षक बँकेच्या नेत्यांनी शिक्षक बँकेची इमारत उभारली तीच इमारत, विक्री करण्याच्या उद्देशाने नवीन इमारतीचा घाट घातला असून, त्यासाठी नवीन जागा घेतली आहे. आंदोलन होवू नये म्हणून, सत्ताधाऱ्यांनी बँकेच्या आवारात गाड्या लावून आंदोलनास विरोध केला असून, बँकेचा कामाचा दिवस असून देखील बँकेला कुलूप असून ‘कुलूपबंद’ कारभार सुरु आहे.
सत्ताधाऱ्यांनी सत्ता ताब्यात आल्यानंतर चुकीचा कारभार केल्यानेच ‘बँक बचाव कृती समिती’ स्थापन केली असून येणाऱ्या जनरल सभेमध्ये तीन कोटी ५४ लाख रुपये इमारत फंडासाठी काढलेला पैसे सभासदांना हक्काचे पैसे द्यावेत अशी मागणी केली करत येथून पुढे वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, सदस्य, महेश शरनाथे, मुकुंद सुर्यवंशी, विश्वास पुजारी, संतोष कदम, मुरलीधर दोडके, सदाशिव वारे, शशिकांत बजबळे यांच्यासह मोठ्या संस्ख्येने शिक्षक उपस्थित होते.