माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/निंबवडे : निंबवडे परीसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा बटीक बनवत ओढा पात्रात वाळू माफियांची मुजोरी वाढली असून दिवसाढवळ्या महसूलच्या आशीर्वादाने दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू असून या वाळू तस्करीकडे संबंधित विभागाची डोळेझाक सुरू असल्याचा आरोपी येथील शेतकरी करीत आहेत.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभाग मात्र मात्र गप्प आहेत. त्यामुळे निंबवडे ओढापात्रातून दिवसाढवळ्या शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे नंबर प्लेट काढून टाकण्यात आलेले असून अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही.
वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग कोमात गेल्याचे तस्करांना आळा घालणारा तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी निंबवडे ओढा पात्रातील लगतचे शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.