अभिनेत्री विद्या बालन ही बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयाशिवाय तिचे सोशल मीडियावरील रिल्स व्हिडीओ सुद्धा चर्चेत असतात. नुकताच विद्याने मराठमोळ्या अंदाजात एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम यांची नक्कल करताना दिसत आहे.
मराठी विनोदवीर भाऊ कदमच्या ‘चला हवा येऊ द्या’मधील गाजलेल्या स्किटवर विद्या बालनने मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “ऐका हो ऐका” असं मराठीत कॅप्शन दिलं आहे.
विद्या बालनच्या या मराठी रिल्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर “मराठी लय भारी”, “काय सांगता हो भाऊ भारीच”, “कडक”, “विद्या मॅडम खूपच छान” अशा कमेंट्स केल्या आहे. अनेक मुलाखतींमध्ये मराठी संस्कृती, परंपरा, चित्रपट यांविषयी भरभरून बोलताना दिसते.