Latest Marathi News

BREAKING NEWS

 

कौतुकास्पद : या नादापुढं सगळं बाद ! चिमुकल्याने वाजवलेली हलगी बघून तुम्हालाही वाटेल डीजेची काय गरज; व्हिडीओ पहा…

0 673


सध्याच्या काळात सणांदरम्यान डीजे, बँजो यांचा उपयोग जास्त करण्यात येतो. पण गावातील शुभकार्य, मिरवणूक किंवा एखाद्या कार्यक्रमादरम्यान अनेकदा हलगीचे वादन केले जाते. आज असचं काहीसं सोशल मिडियावरसुद्धा पहायला मिळालं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाळेतील चिमुकला हलगी वाजवताना दिसत आहे ; जे पाहून तुम्हीही काही क्षणासाठी चकित व्हाल आणि चिमुकल्याच्या कलेला दाद द्याल.

 


व्हायरल व्हिडीओ गावातील शाळेचा आहे. शाळेत एखादा कार्यक्रम चालू आहे. शिक्षक खुर्च्यांवर तर विद्यार्थी शाळेच्या क्रीडांगणावर बसले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अगदी मधोमध एक चिमुकला हलगी वाजवताना दिसत आहे. त्याने शाळेचा गणवेश परिधान केला असून हातात हलगी पकडली आहे. टिपरूने (लवचिक काडीच्या सहाय्याने) तो हलगी वाजवत आहे.


. चिमुकल्याच्या हलगी वादनाचे स्वर तुम्हालाही ठेका धरायला नक्कीच भाग पाडतील. व्हिडीओ शेअर करताना ‘पाहिलीत शिकणारा विदयार्थी , करालं तेवढं कौतुक कमीचं’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहणारे अनेकजण चिमुकल्याचे हलगीवादन पाहून, ‘डीजे बी फेल तुझ्या पुढं !’, ‘नादापुढं सगळं बाद’ , ‘हे फक्त मराठी शाळेतचं बघायला मिळेल’


हलगी वादन सादर करणारा चिमुकला शाळेत पहिली इयत्तेत असल्याचं सांगण्यात येतं आहे. तसेच तो साताऱ्याचा राहणारा आहे. इतक्या लहान वयात चिमुकल्याची हलगी वाजवण्याची कला पाहून शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरात जमलेली अज्ञात माणसं एकटक त्याच्याकडे बघत आहेत. अलीकडे डीजे आणि बँजो या नव्या संगीत उपकरणांमुळे हलगी वादनाची कला दुर्लक्षित होत आहे पण, आज या चिमुकल्याच्या निमित्त्याने पुन्हा एकदा हलगी वादनाचा आंनद अनेकांना घेता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.