जळगाव: तिसरी मुलगी झाल्याने वडिलांनीच या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधी दोन मुली आणि त्यानंतर तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून बापाने आपल्याच आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगावातल्या जामनेर तालुक्यातल्या हरिहर तांडा या गावात एका माणसाने तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून आपल्याच आठ दिवसांच्या लेकीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली. हरिनगर तांडा या ठिकाणी रहिवासी असणाऱ्या या इसमाला दोन मुली आहेत. तिसरीही मुलगीच झाल्याने त्याचा संताप झाला. त्या संतापातून आठ दिवसांच्या चिमुरड्या बाळाच्या तोंडात त्याने तंबाखू कोंबली.
त्यानंतर तिला झोळीत झोपवलं. आजारपणामुळे मुलगी दगावली असं कुटुंबाला भासवलं आणि तिच्या मृतदेहाव अंत्यसंस्कारही केले. या प्रकरणी या मुलीच्या बापाविरोधात खुनाचा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. फर्दापूर ते वाकद या रस्त्यावर खड्डा खोदून त्याने मुलीचा मृतदेह त्यात पुरला असंही पोलिसांनी म्हटलं आहे.