माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील सर्व तलावातील शेतीच्या पाण्याच्या मोटारींची वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडलेली होती. परंतु पावसा अभावी पिकांचे नुकसान होत असल्याने सर्व शेतकरी यांनी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची भेट घेऊन आटपाडी तालुक्यातील तलावातील मोटारी चालू होणे बाबत विनंती केली होती.
याबाबत अमरसिंह देशमुख (Amarsinh Deshmukh) यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, खासदार संजय (काका) पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी संबंधित सर्व विभागांना आदेश देऊन आटपाडी तालुक्यातील सर्व तलावातील मोटरींचे विद्युत कनेक्शन तात्काळ जोडून देणे बाबत आदेश दिले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून अमरसिंह देशमुख यांच्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे.