Latest Marathi News

BREAKING NEWS

 

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; आरोपीवर गुन्हा दाखल

0 549


पुणे: एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दररोज त्रास देत होता. त्याची हिंमत एवढी वाढली होती की, मुलीच्या घरात शिरून त्याने तिचा विनयभं करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षीय मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्याची केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (२२, रा. लोहगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ व पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहण्यास होते. गेल्या ८ दिवसांपासून सोमनाथने पीडिता क्लासला जात असताना, तिच्याजवळ येत रिक्षा थांबवली. त्यानंतर तिला रिक्षात बस मी सोडतो असे म्हणत जबरदस्ती केली. यानंतर ११ सप्टेंबर रोजी सोमनाथने मुलीच्या घरात शिरून हॉलमधील सोफ्यावर बसत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पीडितेची आई घरात आल्याने सोमनाथ त्यांना धक्का देऊन पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पिडीतेची आई मागे धावली असता, मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहाने करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.