Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य; या राशींना लाभेल नशिबाची साथ

0 658


मेष: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

 

वृषभ: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा असेल. आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल.

मिथुन: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा असेल. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल होईल.

कर्क: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. दुपार नंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल.

सिंह: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल.

कन्या: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा असेल. आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील.

तूळ: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल.

वृश्चिक: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात असेल. दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी – व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल.

धनु: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर: आज चंद्र 15 सप्टेंबर, 2023 शुक्रवारी सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात असेल. आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.