Latest Marathi News

BREAKING NEWS

 

पाण्याशी खेळण बेतू शकत अंगाशी! खवळलेल्या समुद्रात लाट आली अन् महिलेला क्षणात घेऊन गेली; व्हिडीओ पहा…

0 750


तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात, बोटींगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूही पर्यटक एकत नाहीत. काही वेळेला समुद्राला भरती आलेली असते, तरीही पर्यटक नसतं धाडस करतात, आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच व्हायरल झालेला एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 


या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे. यावेळी काही तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत. यावेळी पिवळ्या साडीत एक महिलाही तिथे दिसत आहे. सुरुवातीला किनाऱ्यावर उभी असलेली महिला हळू हळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही.
पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते.

यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही. आणि ती लाटेसोबत समुद्रात खेचली जाते. ती उठण्याचा प्रयत्न करते तेच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचते हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.


दरम्यान किनाऱ्यावर असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो, बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात येत. त्या तरुणाचं लक्ष गेलं म्हणू महिलेचे प्राण वाचले अन्यथा महिलेचा जीव गेला असता.

Leave A Reply

Your email address will not be published.