कार्यक्रमामध्ये उखाणा तर सगळेच घेतात! पण ‘या’ बायकोने नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा ऐकून नवराही चक्क लाजला; व्हिडीओ एकदा पहाच …
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. काव्यमय पद्धतीने अप्रत्यक्षपणे नवऱ्याचे किंवा बायकोचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. लग्न किंवा इतर विशिष्ट प्रसंगी किंवा सणांमध्ये घरातील ज्येष्ठ किंवा कुटुंबातील लोकं जेव्हा विवाहित जोडप्याला नाव घेण्यास सांगतात, तेव्हा ते उखाणा घेतात.
सोशल मीडियावर उखाण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खानदेशी, कोल्हापुरी किंवा पुणेरी उखाण्याचे व्हिडीओ नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या अशाच एका गोड उखाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पत्नी नवऱ्यासाठी सुंदर उखाणा घेताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल, घरचे लोक एका विवाहित तरुणीला नवऱ्याचं नाव घेण्याचा आग्रह करतात. ही तरुणी खाली जमीनीवर निवांत बसलेली असते आणि तिच्या शेजारीच तिचा नवरासुद्धा बसलेला असतो. नाव घेण्यास सांगितल्यावर ही विवाहित तरुणी खूप सुंदर उखाणा घेते. ती उखाणा घेताना म्हणते, “लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड… बघितलं का सर्वांनी माझा गणू हसतो किती गोड.”
बायकोचा हा उखाणा ऐकून शेजारी बसलेला नवरा चक्क लाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.