‘बादल बरसा बिजुली’ या गाण्यावर छोट्याश्या चिमुकल्याचा भन्नाट डान्स! बघून तुम्हीही खुश व्हाल; व्हिडीओ पहा…
‘
सोशल मीडिया आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकजण सोशल मीडियावर तासन तास इन्टाग्राम रिल्स आणि युट्युब शॉट्सचे व्हिडीओ पाहण्यात घालवतो. एवढंच काय अनेकजण कोणतेही नवीन गाण ट्रेंड व्हायला लागले की लगेच व्हिडीओ करुन पोस्ट करत असतात.
सध्या असेच गाण सोशल मीडियावर चर्चेत आहे ते म्हणजे.. ”बादल बरसा बिजुली”. आता या गाण्यावर तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडीओ पाहिले असतील, अनेकांचे डान्स पाहिले असतील. पण सध्या एका चिमुकल्याचा या गाण्यावरील डान्स चर्चेत येत आहे. चिमुकल्याचा डान्स पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल.
व्हिडीओ एका शाळेतील असल्याचे दिसते. एक चिमुकला शाळेच्या गणवेशामध्ये स्टेजवर नाचत आहेत आणि खाली उभे असलेले विद्यार्थी देखील उत्साहाने नाचताना दिसत आहे. ‘बादल बरसा बिजुली’ या गाण्यावर एक चिमुकला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. चिमुकल्याचे हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. चिमुकल्याला त्याचे मित्र प्रोत्साहन देताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकही डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे.