Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक: आईबपानेच भीक मागण्यासाठी विकले पोटच्या मुलीला

0 381


पुणे : प्रत्येक मुल म्हणजे आईबापासाठी काळजाचा तुकडा असतो. पण भीक मागण्यासाठी आपया पोटच्या गोळ्याला विकणारे आईवडील हे नराधमच म्हणावे लागेल.

 


भीक मागण्यासाठी आपल्याच चार वर्षाच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी २ हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिचा ताबा असलेल्या दोघा पती पत्नीला अटक केली आहे.


याबाबत अॅ ड. शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकिल असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना कळविले की, दोघा आई वडिलांनी त्यांची ४ वर्षाची मुलगी तिघा जणांना २ हजार रुपयांना विकली आहे. समाजातील १० पंचांची त्यासाठी सहमती घेतली आहे.

दोघांनी या मुलीला येरवडा येऊन २ हजार रुपयांना भीक मागण्याच्या उद्देशाने बारामती येथील सुपे येथे घेऊन गेले असून तिला गुलाम बनवून जबरदस्तीने भीक मागायला लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आपण या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक नांगरे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.