Latest Marathi News

BREAKING NEWS

 

पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून वन कर्मचाऱ्याचा निर्घुण खुन

0 1,319


कोल्हापूर : अनैतिक संबंधाचा संशय घेत असल्याच्या रागातून भाजीपाला विक्रेता युवराज बळवंत कांबळे (वय २७ रा. कुडूत्री, ता. राधानगरी) याने वान कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय ५०, रा. आणाजे, ता. राधानगरी) याच्या डोक्यात दगड घालून निघृर्ण खून केला. वारे वसाहत परिसरात बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

 

भास्कर कांबळे व भाजीपाला विक्री करणारा युवराज कांबळे यांचे मैत्रीचे संबंध होते. ते दोघेही कुटुंबासह वारे वसाहत परिसरात राहत होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मात्र, युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय भास्कर कांबळे याला होता. त्यातून त्यांच्यात वाद होता.


हा वाद मिटवण्यासाठी बुधवारी सायंकाळी दोघे संभाजी नगर येथील एका मित्राच्या घरात एकत्र आले होते. वाद मिटवून परत जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाला. झटापटीत खाली पडलेल्या भास्कर कांबळे याच्या डोक्यात दगड घालून युवराजने त्यांना ठार मारले. त्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.