Latest Marathi News

BREAKING NEWS

 

Jayant Patil : शासन आपल्या दारी, खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावरी

0 331

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : राज्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे. या कार्यक्रमावर होणारा अफाट खर्च हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. यावर राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील गंभीर आरोप केले असून या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

 


शासन आपल्या दारीच्या एका कार्यक्रमासाठी फक्त मंडपाचा खर्च हा जवळपास २.२ कोटी इतका असल्याचे एक टेंडर माझ्या पाहण्यात आले. सरकारने सरळसरळ लोकांच्या पैशांची उधळपट्टी लावली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम करायचे. भीती घालून सक्तीने लोकं जमवायची. शासकीय यंत्रणा, अधिकारी वर्ग यांना कामाला जुंपायचे. विरोधकांवर त्या मंचावरून टीका करायची. स्वतःचा उदोउदो करायचा हा नवीन उद्योग सुरू केला आहे.


एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, राज्यातील काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि दुसरीकडे पैशांची अशी उधळण सुरू आहे. “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं” अशाने प्रश्न सुटत नसतात, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.