माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी या बँकेला आर्थिक वर्ष 2021-22 चा दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि. मुंबई यांचेमार्फत देण्यात येणारा कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य अनिल कवडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिताई अहिरे व राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि. मुंबई अध्यक्ष विश्वास ठाकुर यांचे हस्ते नाशिक येथे नुकताच प्रदान करणेत आला.
दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी या बँकेची अमरसिंह देशमुख यांनी सन 1997 साली स्थापना केली. दुष्काळी भागात कार्यरत असूनही बँकेने राज्यभर बँकिंग व्यवसायामध्ये आदर्श निर्माण केला आहे. बँकेचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा असून सध्या दहा शाखा कार्यरत आहेत. बँकेने 1000 कोटी व्यवसायाकडे वाटचाल सुरु केली आहे.
बँकेच्या ठेवी 377.68 कोटी, कर्जे 262.69 कोटी, भाग भांडवल 16.59 कोटी, स्वनिधी 34.18 कोटी, गुंतवणूक 140.48 कोटी, निव्वळ नफा 4.42 कोटी, नेट एन.पी.ए. 0.00%, सी.आर.ए.आर. 14.76% आहे. बँकेचा ऑडीट वर्ग सतत ‘अ’ आहे. बँक सभासदांना सतत 10% लाभांश देत आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 640.37 कोटी आहे.
आतापर्यंत बँकेला सलग 13 वर्षे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळत असून सदरचा 15 वा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार आहे. दि महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बॅक्स् फेडरेशन मुंबई यांचेकडून सहा वेळा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक्स् असोसिएशन मुंबई यांचेकडून हा 6 वा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे.
बँकेला महाराष्ट्र शासनाकडून सहकार निष्ठ हा राज्यस्तरीय पुरस्कार 2015-16 मिळाला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्याकडून जिल्हास्तरीय कर्तव्यदक्ष सेवागौरव पुरस्कार मिळाला आहे. सदरचा पुरस्कार सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी पुणे विभागातून रु. 250 कोटी ते 500 कोटी ठेवी असणाऱ्या बँकामधून “कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार” मिळाला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. अमरसिंह देशमुख, चेअरमन श्री. दादासाहेब पाटील, आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. भगवंत आडमुठे-पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.