माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : येथील सेवक सहकारी पतमंडळाच्या वतीने आकस्मित निधन झालेल्या मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार पतमंडळाचे सभासद असलेले शांतीलाल नेताम यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या वारसांना सेवक पतमंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांची सेवक पतमंडळ आहे. या पतमंडळाच्या वतीने आकस्मित निधन झालेल्या सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येते. मंडळाचे सभासद असणारे व दिघंची हायस्कूल,दिघंची येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक शांतीलाल मणिराम नेताम यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या वारसांना पत मंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत व स्मृतिप्रीत्यर्थ आंब्याचे रोप देण्यात आले.
यावेळी दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व पतमंडळाचे मार्गदर्शक व सल्लागार अमरसिंह देशमुख, पतमंडळाचे चेअरमन सदाशिव मोरे, व्हा.चेअरमन दिलीप बुरूंगले, कायदेशीर सल्लागार ॲड. चेतन जाधव, सर्व संचालक, सचिव दशरथ बनसोडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.