Latest Marathi News

BREAKING NEWS

 

भावनिक: शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर माकडही रडू लागलं; व्हिडीओ पहा…

0 688


मानव आणि प्राणी यांच्यातील मैत्री नेहमीच खास राहिली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून समोर आली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र असलेला माकड घरी आलं. मृतदेहाजवळ बसलं. माकडाने कुटुंबातील रडणाऱ्या महिलांचंही त्यांच्या जवळ जाऊन सांत्वन केले.

 

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर माकडाला रडू आलं. हा भावनिक क्षण उपस्थित असलेल्या लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बिजुआ भागात असलेल्या गोंधिया गावातील आहे.


माकड मृतदेहाजवळ बसून रडू लागलं. यानंतर माकड जवळच असलेल्या महिलेपर्यंत पोहोचलं. तिचे सांत्वन करू लागलं. हा सगळा प्रकार पाहून कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन हे त्यांच्या शेतात जाताना माकडासोबत त्यांची मैत्री झाली होती. ते या माकडाला अन्न द्यायचे आणि अनेक वर्षांपासून मैत्री होती.

Leave A Reply

Your email address will not be published.