Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक! रेस्टॉरंटमध्ये बिलाचे पैसे मागितल्याने कर्मचाऱ्यांना मारहाण

0 580


उत्तर प्रदेश: नोएडातील सेक्टर-29 येथील गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या रेस्टॉरंटमध्ये काही लोक जेवण्यासाठी आले होते. बिलासाठी पैसे मागितल्यावर गुंडांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मद्यधुंद गुंडांच्या मारामारीची घटना कैद झाली आहे.

 


रेस्टॉरंट कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून कोतवाली सेक्टर 20 पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेमध्ये कर्मचाऱ्यांनी बिलाची मागणी केल्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या लोकांनी त्यांना मारहाण कशी केली हे दिसत आहे.


ही घटना सेक्टर-29 येथील गंगा शॉपिंग येथील कुक डू कुक रेस्टॉरंटमध्ये घडली, जिथे हिमांशू आणि गौरव यादव नावाचे गुंड इतर दोघांसह जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आले आणि जेवणाचे 650 रुपये बिल न भरता निघून गेले. रेस्टॉरंटचा कर्मचारी शहाबुद्दीनने जेवणाचे बिल भरण्यास सांगितले असता शहाबुद्दीनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


यानंतर शहाबुद्दीनला खाली पाडून बेदम मारहाण केली. गुंडांनी जीवे मारण्याची धमकी देत कारमधून पळ काढला. शहाबुद्दीनच्या तक्रारीवरून कोतवाली सेक्टर 20 पोलिसांनी कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.