जिथे भीती संपते तिथून खरा संघर्ष चालू होतो! एकट्या म्हशीने दिली सिंहाला टक्कर; नक्की काय घडल; व्हिडीओ पहा…
सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही. सिंहाला सर्वात धोकादायक शिकारी देखील म्हटलं जातं. जर त्याने एखाद्याची शिकार करण्याचा निर्णय घेतला तर तो क्वचितच मागे हटतो. त्याचे पंजे इतके मजबूत असतात की ते सर्वात मोठी शिकारही सहज पकडू शकतात.
सहसा त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याची हिंमत करत नाही. पण सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंह म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, मात्र नंतर जे काही होतं, त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
असं म्हणतात जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होते, असंच काहीसं या व्हिडीओमधून समोर आलेल आहे. एरवी वाघ, सिंहाच्या तावडीतून निसटणं तसं अवघड पण एका म्हशीने चक्क सिंहाला टक्कर दिली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,जंगलात दोन म्हशींच्या मागे शिकारीसाठी सिंह लागला आहे. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर एक म्हस उलटून सिंहालाच दम देताना दिसत आहे. एवढावेळ सिंहापासून बचावासाठी पळणारी म्हस अचानक उलटी फिरते आणि सिंहाला टक्कर देते. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.