लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेट खेळायला खूप आवडते. भारताची एखादी खास मॅच असेल तेव्हा आपण होम थिएटर लावून, मोठ्या पाड्यावर स्क्रीनिंग करून सामना बघतो. आपल्या देशात क्रिकेटचं सगळ्यांना एवढं वेड आहे की, तुम्ही मैदान, चाळ, टेरेस, बीच आदी अनेक जागांवर तरुणांना क्रिकेट खेळताना पाहिलं असेल. पण, तुम्ही कधी कोणाला पाण्यात क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का ? तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. काही तरुण पाण्यात अनोख्या क्रिकेटचा सामना खेळताना दिसून आले आहेत.
एका नदीत क्रिकेटचा हा अनोखा सामना रंगला आहे. सुरुवातीला एक व्यक्ती पाण्यातून वर येते आणि उभी राहते. त्याच्या कमरेपर्यंत पाणी असते. पाण्यात मागे दोन विकेटकीपर आणि बाकीचे खेळाडू सर्वत्र त्यांच्या नेमून दिलेल्या जागेवर उभे आहेत. त्यानंतर पाण्याखाली आधीच उपस्थित असलेला एक तरुण बॅट घेऊन बाहेर येतो आणि नंतर चौकार व षटकार मारताना दिसतो आहे.
पाण्यात उभा असताना तो बॅटने चेंडू मारतोय आणि फलंदाजी करता करता पाण्यातही पडतो आहे. तसेच मुलं पाण्यात उभी असताना फिल्डिंग करतानासुद्धा दिसून येत आहेत. व्हिडीओतील तरुण मुलांचं क्रिकेटवरील प्रेम या व्हिडीओप्रमाणेच अनोखं आहे, असं म्हणायला हरकत नाही. व्हिडीओतील कॉमेंट्री आणि विविध आवाज ऐकून एखाद्या सामन्याचे थेट प्रक्षेपण चालू आहे, असे तुम्हाला जाणवेल.
क्रिकेटचा सामना टीव्हीवर सुरू झाला की, आपल्यातील अनेकांची टीव्हीवरून नजर हटत नाही. तसेच काहीसं हा व्हिडीओ बघूनदेखील तुमची नजर हटणार नाही, कारण- या व्हिडीओत तरुण चक्क पाण्यात क्रिकेट खेळत आहेत आणि बघणाऱ्यांचा उत्साह वाढवत आहेत. हा व्हिडीओ खास मनोरंजनाच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे; तसेच क्रिकेट खेळणाऱ्या या मुलांचा उत्साहदेखील अप्रतिम आहे.
एशिया कप का सीधा प्रसारण. pic.twitter.com/UNFXyltUND
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) September 10, 2023