Latest Marathi News

BREAKING NEWS

 

‘या’ अभिनेत्याच्या घरी बाप्पाचं आगमन होतं पण विसर्जन होत नाही; जाणून घ्या! काय असेल कारण…

0 311


सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अनेकांच्या घरी, गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यामध्ये कलाविश्वातील काही कलाकारांच्या घरीही बाप्पाचं आगमन होतं. यात सध्या अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरचा बाप्पाची चर्चा रंगलीये. श्रेयसच्या घरी दरवर्षी गणरायाचं आगमन तर होतं. पण, त्याचं विसर्जन कधीच होत नाही. यामागचा एक किस्सा आणि ही परंपरा कशी सुरु झाली हे श्रेयसने एका मुलाखतीमध्ये सांगितले.

 

“मी नवीन घर घेतलं तेव्हा आम्ही ठरवलं होतं की घरी बाप्पाचं आगमन करायचं. आम्ही सलग सात वर्ष दीड दिवसांचे बाप्पा घरी आणले. पण मधल्या काळात माझे बाबा वारले. तेव्हा मी फार चिडलो होतो. ज्या पद्धतीने हे सगळं घडलं. ते माझ्यासाठी फारच धक्कादायक होतं. त्यामुळे मी चिडून यापुढे गणपती बसवायचा नाही असं ठरवलं”, असं श्रेयस म्हणाला.


पुढे तो म्हणतो, ”नंतर मला मुलगी झाली. मग, आपण घरी बाप्पा आणू या का? असं तिने विचारलं. तिच्या म्हणण्यानुसार आम्ही पुन्हा बाप्पांना घरी आणायला सुरुवात केली. घरी गणपती आणल्यानंतर तिने शेजारच्यांच्या गणपतीचं विसर्जन पाहिले. आम्हीही आमच्या बाप्पाच्या विर्सजनाची तयारी केली. हौद बांधला. पण, ती घरी आली आणि आपण बाप्पाचं विसर्जन करायचं नाही असं म्हणून हट्ट करायला लागली. त्यामुळे शेवटी आम्ही गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला.”


दरम्यान, श्रेयस त्यांच्या घरी आलेल्या बाप्पाचं कधीच विसर्जन करत नाही. गणपतीचं विसर्जन करण्याऐवजी तो बाप्पाच्या पायाशी थोडीशी माती लावतो आणि ती माती विसर्जन करतो. तसंच जी बाप्पाची मुर्ती असते ती घरात ठेवतो आणि दरवर्षी त्या मुर्तीला तो रंगरंगोटी करुन पुन्हा त्या मुर्तीची पूजा केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.