मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्या अभिनयाने आणि सौदर्यांनी अनेक प्रेक्षकांनी मनं जिकली. मराठी मालिका तसेच चित्रपटातून मृण्मयीने प्रेक्षकांची पसंती मिळवली. मृण्मयीच्या पावलांवर पावलं ठेवतं तिची बहिणी गौतमी देशपांडेने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. त्या दोन्ही बहिणींमध्ये त्यांच्या नात्यापलीकडची मैत्री पाहायला मिळते. आता त्या दोघींचा सेटवर भांडणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
गायक, संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत मृण्यमी आणि गौतमी या एका चष्माबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा संवाद सलील कुलकर्णी यांनी लिहिला आहे.
“हा संवाद पाहा
मोठी बहीण – हा माझा चष्मा आहे ….
लहान बहीण – अगं पण …
मोठी – अगं बिगं नाही ….जे दोन असे चष्मे आणले होते त्यातलाच हा आहे
लहान – अगं मी माझा आणला आहे चष्मा …
मोठी – तुला बघते थांब …
तेवढ्यात shooting सुरू झाल्यामुळे त्यांचे भांडण त्यांना थांबवावं लागलं. या बहीणींनी एकदा आमच्या मैत्रिणी असलेल्या दोन गुणी अभिनेत्री भगिनी मृण्यमी देशपांडे आणि गौतमी देशपांडे एकमेकींशी किती प्रेमानी बोलतात, हे बघायला हवं. त्यांच्याकडून शांतपणे बोलणं शिकायला हवं”, असे सलील कुलकर्णींनी यांनी म्हटले आहे.