माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी येथील जयंत मधुकर नेवासकर वय ६७ यांचे आज दिनांक १२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
जयंत नेवासकर हे ब्राम्हण महासंघाचे प्रदेश सदस्य होते. त्याच बरोबर ते महावितरणचे माजी कर्मचारी देखील होते. इंटक रा कामग्र संघटनेचे पद देखील त्यांनी भूषवले होते. त्याचबरोबर ते सध्या आटपाडी येथील भास्करराव देशपांडे पतसंस्थेचे संचालक होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.