Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : अपघातामध्ये जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू

0 9,170

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची येथील इंद्रभाग्य प्रशालेमध्ये बी.फार्म.सी. च्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या प्रतिक्षा सुखदेव पाटील (वय 20) (Pratiksha Patil) ही तरुणी आपल्या मैत्रीणीसह रूमकडे जात असताना तिला शनिवार दिनांक ०९ रोजी दुचाकीस्वाराने धडक दिली होती. यामध्ये तिला गंभीर इजा झाली होती. तिच्यावर सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. परंतु आज दिनांक 11 रोजी तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.

 


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी पुजारवाडी (आ) येथील प्रतिक्षा सुखदेव पाटील ही बी.फार्म.सी. च्या शिक्षणासाठी दिघंची येथे वास्तव्यास होती. शनिवारी सायंकाळी ७.०० च्या सुमारास प्रतिक्षा पाटील व तिच्या अन्य दोन मैत्रिणी आपल्या रूम कडे जात असताना इंद्रभाग्य प्रशाले जवळ राज्य महामार्गांवर एका दुचाकीस्वार ने धडक दिल्याने प्रतिक्षा पाटील गंभीर जखमी झाली.


जखमी अवस्थेत तिला आटपाडी येथे उपचारासाठी हलवण्यात आले. त्यानंतर सांगली येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर सोमवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूने पुजारवाडी येथील पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.