व्हिडीओ : निवडणुका आल्याने पाकीटमार सगळ्यात पुढे ; विशाल पाटील यांची खास. संजयकाका पाटील यांच्यावर नाव न घेता टीका
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सध्या निवडणुकाचा हंगाम सुरु असून गेली पाच वर्ष कधीही न फिरणारे खासदार आता फिरू लागले असून अनेकांच्या खांद्यावरती ते हात टाकत फिरत असून कधी त्यांचे पाकीट मारतील हे कळणार देखील नाही, अशी टीका काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी खास. संजयकाका पाटील यांच्यावर नाव न घेता केली. ते आटपाडी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंवांद पदयात्रेतील खरसुंडी येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांनी या देशामध्ये ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली ती लोकांची अडी-अडचणी एकूण घेण्यासाठी काढली होती. परंतु सध्या देशाला जे नेतृत्व मिळाले आहे ते कुणाचे ऐकत नाही. फक्त बोलतय. आणि फक्त जो बोलतो तो लादतो. त्यांचे कान हे पूर्वीच कुणीतरी विकत घेतले आहेत. त्यामध्ये एक कान अडाणी आणि दुसरा कान अंबानीने विकत घेतला आहे. त्यामुळे यांना कुणाचे ऐकायला येत नाही. साडे नऊ वर्षात एकही पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नेतृत्व म्हणून आपले पंतप्रधान यांची ओळख आहे.
सध्या लोकांच्या अडी-अडचणी या लोक त्यांच्या त्या सोडवण्यासाठी तयार असले तरी, त्यांचे कुणीतरी ऐकायला या एवढीच अपेक्षा आहे. पंतप्रधान दररोज येतात, पण टीव्हीवर येतात. क्रिकेट सामना असला तरी मोदी अन चंद्रयान असले तरी मोदीच दिसतात.परंतु सर्व सामान्य जनतेच्या घरापर्यंत जावून त्याचं ऐकून घेणारे फक्त राहुल गांधी होते. ‘भारत जोडो’ यात्रे दरम्यान लोकांच्या अडी-अडचणी त्यांनी लोकसभेमध्ये जावून त्यांच्या अडचणी मांडल्या. आजच्या पदयात्रेमध्ये ही विश्वजितकदम यांच्याकडे जावून लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले, कधी नाही ते खासदार खरसुंडी तसेच आटपाडी तालुक्यात आले होते. निवडणूक आले की, हौशी, गौशे, नवसे सगळी गोळा होतात. निवडणूक आल्याने पाकीटमार सगळ्यात पुढे असतात. निवडणूक असल्याने माझ्या खांद्यावर कुणीतरी हात टाकल्याने लय खुश झाली. परंतु नंतर बघितले तर, पाकीट गायब झाले आहे. तसे जिल्ह्यातील खासदार निवडणूक आल्याने सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकत असून कधी तुमच्या खिशातील पाकीट कशी काढून नेईल अशी टीका करत, कारण दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय त्यांना लागलेली असल्याचे ते म्हणाले.
पाण्याच्या आवर्तनाचा आणि खासदाराचा काहीही संबंध नाही ते राज्य सरकार ठरविते. खासदारांनी ज्या योजना अर्धवट राहिल्या आहेत त्यांना निधी आणण्यासाठी काम केले पाहिजे. परंतु आपले खासदार हे दिल्लीत फिरकत नाहीत, संसदेत किती प्रश्न मांडले, किती वेळा बोलले, एक हि गोष्ट ते आपल्यासाठी करू शकले नाहीत. खरसुंडी गावामध्ये नऊ वर्षात एक काम दिले, परंतु देवापेक्षा मोठे नाव त्यांनी त्या ठिकाणी लावले असल्याची टीका देखील त्यांनी केली.
आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्याला न्याय देण्याचे काम स्व. पतंगराव कदम साहेबांनी केले असून यापुढे जिल्ह्यामध्ये ती जबाबदारी विश्वजित कदमांनी खांद्यावर घेतली असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील खासदार, आमदार हे विश्वजित कदम यांच्या विचारांचे निवडून येणार असल्याचे म्हणत, आटपाडी तालुक्यातील सर्व जमीन पाण्याखाली आणण्याची जबाबदारी हे विश्वजित कदम यांनी खांद्यावरत घेतली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जितेश कदम हेच उमेदवार असतील असा संकेत देखील त्यांनी यावेळी उपस्थितीतांना दिला.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा