माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यात काँगेसच्या वतीने जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेची सुरुवात ही तालुक्यातील नेलकरंजी गावातून सुरू झाली. या यात्रेचे स्वागत आटपाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष जयदीप भोसले यांनी मोठ्या उत्साहात केले. यावेळी युवा नेते विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम, अशोकराव गायकवाड संभाजी जाधव, मजूर फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासो भोसले, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, संचालक भगवान पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने काँगेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.