Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी तालुक्यात येणाऱ्या काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला प्रखर विरोध : राजेश जाधव

0 298

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यांना बोलायला वेळ नाही आणि कॉंग्रेसच्या वतीने सांगली लोकसभा निवडणुकीची तयारी असून असून, मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर नैतिक जबाबदारी स्वीकारून भूमिका घेत नाहीत तो पर्यंत सर्व राजकीय नेत्यांना सकल मराठा समाजाचा विरोध राहणार असून आटपाडी तालुक्यात येणाऱ्या काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला प्रखर राहणार असल्याचे राजेश जाधव यांनी सांगिलते.

 


पुढे बोलताना ते म्हणाले, आटपाडी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकत आहे. काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला आमचा प्रखर विरोध राहील. अंतरावली सराटी येथे अमानुष लाठी हल्ला झाला व गोळीबार करून सरकारने अत्याचार केला.


तसेच दोन युवकांनी आरक्षणासाठी आपला प्राण दिला आहे. वासनवडी बीड मधील महिलांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले. मात्र मराठा आरक्षणाच्या या संवेदनशील प्रश्नावर एकही मराठा खासदार-आमदार आपला निषेध व्यक्त करत नाही, एकही आमदार व खासदार राजीनामा देत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठा आरक्षणावर एक चकार शब्द काढत नाहीत, आमदारही आपली भूमिका मांडत नाही.


आजपर्यंत मराठ्यांना गृहीत धरून मतांसाठी गोरगरीब मराठा समाजातल्या तरुणांचा वापर करून घेतला जात आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यांना बोलायला वेळ नाही आणि कॉंग्रेस सांगली लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर नैतिक जबाबदारी स्वीकारून भूमिका घेत नाहीत तोवर सर्व राजकीय नेत्यांना सकल मराठा समाज आटपाडीचा प्रखर विरोध राहणार असल्याचे राजेश जाधव म्हणाले. यावेळी तानाजी नांगरे, मंगलनाथ देशमुख, विकास देसाई,अतुल गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.