माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील उंबरगाव ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच शिवाजी महादेव कुचेकर यांचे आज दिनांक ०८ रोजी पहाटे दु:खद निधन झाले.
शिवाजी कुचेकर हे गरीब गरीब परिस्थितीत वर आले होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात शिलाई व्यवसायात जम बसविला होता. त्यामुळे उंबरगाव परीसरामध्ये ते टेलर या नावाने परिचित होते.
राजकारणात प्रवेश करताना सुरुवातील ग्रामपंचायत निवडणूक लढविली. यामध्ये ते विजयी झाले. पुढील पंचवार्षिक मध्ये त्यांनी विजय मिळत उपसरपंचपद मिळविले. त्यानंतर त्यांनी थेट सरपंचपदाची निवडणूक लढविली व लोकनियुक्त सरपंच म्हणून ते निवडून आले. त्यांनी सरपंच पदाचा काळात गावामध्ये अनेक विकासकामे केली. त्यांच्या दु:खद निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, पत्नी, आई, वडील असा मोठा परिवार असून त्यांच्यावर आज दुपारनंतर उंबरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.