Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी आढावा बैठकीत मुख्य कार्यकरी अधिकारी धोडमिसे आक्रमक ; कर्मचाऱ्यांनी कामात टाळाटाळ, हलगर्जीपणा केल्यास खपवून घेणार नसल्याचा इशारा

0 2,878

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आक्रमक होत अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच कानउघडनी करत, घरकुल योजना, रोजगार हमी योजना, जलजीवन पाणी पुरवठा योजना या कामात जर टाळाटाळ केली तर प्रशासकीय जबाबदारी निश्चिुत करुन प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा दिला.

 


मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली श्रीमती तृप्ती धोडमिसे यांचे अध्यक्षतेखाली, व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशीकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किरण सायमोते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, कार्यकारी अधिकारी (प्रा.पा.पु) श्री येवले यांचे उपस्थितीत पंचायत समिती आटपाडी कडील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृहात आज आढावा सभा पार पडली. सदर सभेमध्ये पंचायत समिती आटपाडी कडील सर्व विभागाचा विषयनिहाय आढाबा घेणेत आला.


मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ वा वित्त आयोगाचा पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील प्राप्त निधी १००% खर्च करणे व कोणत्याही कारणास्तव सदर निधी शासनास परत जाता कामा नये. अशा सक्त सूचना दिल्या. जलजिवन मिशन योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सुरु कामे प्राधान्याने लवकर पुर्ण करणेत यावीत, सदर कामांना नियमित भेटी देणेत याव्यात, व कामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. तालुक्याकतील प्रधानमंत्री घरकुल योजना, यशवंत घरकुल योजना व इतर घरकुले १ महिन्यात पुर्ण करुन सर्व घरकुल लाभार्थी यांना हप्ते वर्ग करणे बाबत कार्यवाही करणेत यावीत अन्यथा ग्रामसेवक यांचेवर जबाबदारी निश्चिनत करुन प्रशासकोय कार्यवाही करण्याचा व कोणत्याही कर्मचारी यांचेकडून कामात टाळाटाळ हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्या म्हणाल्या.


ग्रामपंचायत कडील घरपटटी, पाणीपटटी जास्तीत जास्त वसूल करणे बाबत योग्य त्या उपाय योजना करणेत याव्यात. ग्रामसेवक तसेच सर्व कर्मचारी यांनी आपले दप्तर अद्यावत ठेवणेचे आहे. यात कसूर करणेत आलेस कोणाचीही गय करणेत येणार नाही असा इशारा देखील दिला.


उपमुख्य कायर्कारी अधिकारी निखील ओसवाल यांनी म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत सुरु कामांचा काम निहाय आढावा घेतला. आठ गांवामध्ये एकही काम नसलेबाबत नाराजी व्यक्त केली. शेटफळे येथील ग्रामविकास अधिकारी लखन सनदी यांनी अद्याप ग्रामपंचायत शेटफळे कडील कार्यभार हस्तांतर केले नसलेमुळे त्यांचेवर १७९ खाली कार्यवाही प्रस्तावित करणेत यांवी. तसेच आनंदा मोरे यांनी पळसखेल व पुजारवाडी (आ) ग्रामपंचायतीकडील कार्यभार हस्तांतर न केलेने त्यांचेबर देखील १७९ खाली कार्यवाही प्रस्तावित. करणेत यावी. अशा सुचना दिल्या.


गटविकास अधिकारी श्री माडगुळकर यांनी प्रस्ताविक केले. सदर सभेस पंचायत समिती आटपाडी कडील सर्व ग्रामसेवक, सर्व खाते प्रमुख, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.