आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली ; सराटी घटनेचा निषेध व्यक्त करत, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत आटपाडी येथे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या मध्ये आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली वाहत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
आटपाडी येथे आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आटपाडी बंदचे आवाहन करण्यात आले होते. प्रारंभी आटपाडी बस स्थानक येथे मराठा समाज बांधव एकत्र जमले. या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली. मेन व्यापारी पेठ मार्गे मोर्चा बाजार पटांगण मार्गे आटपाडी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आला.
तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मोर्चा आल्यावर मोर्चाचे रुपांतर, बैठकीत झाले. या ठिकाणी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, गौरीहर पवार, शरद पवार, प्रा. विजय शिंदे, बापूसाहेब गिड्डे, आनंदरावबापू पाटील, डी.एम. पाटील, अॅड. धनंजय पाटील, सौरभ पाटील, बी.ए. पाटील, सादिक खाटिक, जीन्तेद्र जाधव, तानाजी नांगरे, पोपट पाटील, मनोज पाटील,महेश पाटील, अनिता पाटील, संभाजी पाटील, अशोक देशमुख, विपुल कदम, अतुल यादव, मोहनभाऊ देशमुख, शिवाजीतात्या पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, तानाजी नांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालय या ठिकाणी देण्यात आले.