Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी बंदची सकाळच्या सत्रातील काय आहे परिस्थिती ; वाचा संपूर्ण बातमी

0 1,692

जालना जिल्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांच्या वरती झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्यासाठी आज दिनांक ०७ रोजी सांगली जिल्हा बंद ची हाक देण्यात आली होती. या बंद मध्ये आटपाडी तालुक्याच्या देखील समावेश असून सकाळच्या सत्रातील आटपाडी बंद ची काय आहे परिस्थिती पाहूया.

 

नेहमी माणसांची वर्दळ असणाऱ्या आण्णाभाऊ चौकातील सर्व दुकाने बंद असल्याने या ठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळाला.
बंद जरी असला तरी, कॉलेज, महाविद्यालये सुरु असल्याने या परिसरात विद्यार्थ्यांची वर्दळ असली तरी, दुकाने मात्र संपूर्णपणे बंद होती.
शहरातील सिद्धनाथ चित्र मंदिर चौकामध्ये देखील दुकाने बंद असल्याने या ठिकाणी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती.
शहरातील नगरपंचायत जवळील सर्व दुकाने बंद असली तरी, या ठिकाणी नागरिक मात्र दुकानच्या आजूबाजूला बसलेली दिसत असली तरी दुकाने मात्र पूर्णपणे बंद होती.
बस स्थानक परीसरामध्ये एस.टी. बसेच ची ये-जा सुरु असल्याने बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरु होती. मात्र बस स्थानकातील हॉटेल बंद असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.
शहरातील आबानगर चौक या ठिकाणी देखील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने नेहमी माणसांनी गजबजलेल्या चौकात शुकशुकाट होता.

Leave A Reply

Your email address will not be published.