माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर पाण्यासाठी आक्रमक होताच, तळेवाडी येथून वाहणाऱ्या टेंभू योजनेच्या कालव्यातून अधिकाऱ्यांनी स्वत: जेसीबी आणत कालव्यातून मार्ग काढत शेटफळे तलावात पाणी सोडल्याने येथी शतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
आटपाडी तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून गणला जात असून टेंभू योजनेचे पाणी आले असले तरी सुद्धा तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसत असून अनेक पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. तरी काही जळण्याचा मार्गावर आहेत. त्यातच तालुक्यातून टेंभू योजनेचे पाणी सांगोला, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात जात असल्याचे पाहून शेतकरी हतलब झाले होते. याबाबत शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती.
याबाबतची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांना समजताच त्यांनी स्वत: पुढाकार घेत टेंभू योजनेच्या मुख्य कालव्यातून सांगोलाकडे जाणारे पाणी रोखत ते तालुक्यातील निंबवडे, आवळाई, विठलापूर गावाआठी पाणी सोडले. परंतु हे पाणी सोडत असताना शेटफळे तलाव मात्र कोरडा पडला होता. त्यामुळे शेटफळे येथे जेष्ठ नेते दत्तात्रय कांबळे यांनी याबाबत आवाज उठवत शेटफळेसाठी पाणी सोडण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती.
त्यामुळे आज दिनांक ०६ रोजी आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले. ते थेट टेंभू योजनेच्या तळेवाडी येथील कालव्याच्या ठिकाणी गेले. या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आक्रमक होताच स्वत: अधिकारी यांनी याठिकाणी जेसीबी घेवून घेत कालव्यालातून शेटफळे साठी पाणी सोडले. यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.