आटपाडीतील उद्याचा बंद मागे ; जिल्ह्याच्या बंद मध्ये सहभागी होण्याचा आटपाडीतील मराठा समाजाच्या निर्णय
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यासाठी आटपाडी येथे उद्या दिनांक ०६ रोजी मराठा संघटनांनी आटपाडी बंदची हाक दिली होती.
परंतु सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक ०७ रोजी बंद ठेवण्याबाबत निर्णय झाल्याने या बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आटपाडी येथील मराठा समाजाने घेतला असल्याने उद्या होणारा बंद मागे घेण्यात आला असून दिनांक ०७ रोजी आटपाडी बंद ठेवण्यात येणार असून याच दिवशी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा संघटनाच्या वतीने देण्यात आली.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला. यामध्ये बहुसंख्य आंदोलक जखमी झाले. या पाश्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले आहे. या लाठीमार चा निषेध नोंदविण्यासाठी आटपाडी तालुक्यातील मराठा समाजाने उद्या दिनांक ०६ रोजी आटपाडी बंदची हाक दिली होती.
परंतु सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाची वैठ्क संपन्न झाली. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक ०७ रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील मराठा समाजातील नागरिकांची बैठक संपन्न झाली. यामध्ये उद्या दिनांक ०६ रोजी आटपाडी बंद मागे घेण्यात आला असून दिनांक ०७ रोजी आटपाडी बंद राहणार असून या दिवशी मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाजातील मान्यवरांनी दिली.