Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : दोन नंबरवाले बिनधास्त ओढतात वाळू, प्रशासकीय अधिकारी लोण्यासाठी शोधतात सर्वसामान्य शेतकऱ्यांची टाळू

0 1,470

माणदेश एक्सप्रेस न्युज : निंबवडे/राघव मेटकरी : आटपाडी तालुक्यातील, निंबवडे ओढा पात्रातून राजरोसपणे वाळू उपसा चालू आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. ओढा पात्रातील वाळू उपशामुळे ओढा पात्रा शेजारील सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. वाळू माफियानी जेसीबीच्या साह्याने मोठ-मोठे खड्डे पाडल्या मुळे टेंभू योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत येतच नाही.

 


वाळू उपशामुळे पाण्याचं पाझरत नसल्याने शेतकरी पण हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार केली तर अधिकारी तेवढ्यापुरतेच कडक भूमिका घेतात आणि स्वतःचा खिसा भरून त्यांना पुन्हा वाळू उपशासाठी मोकळीक देतात, यातून बऱ्याच शेतकऱ्यांना वाळू माफिया कडून दमदाटी झाली आहे. त्यामुळे हल्ली शेतकरी पण तक्रारी साठी पुढे येत नाहीत.


एक तर पाऊस नाही आणि टेंभू योजनेचे पाणी आले तरी वाळू उपशामुळे ते विहिरी नाही अशा दुहेरी संकटात शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहेत

शनिवारी एका माफियाची गाडी निंबवडे पुला जवळ चाक रुतल्यामुळे फसला होता. त्याने तिथंच खाली करून संध्याकाळी परत तिथूनच अगदी बिनदास्त पणे भरून घेऊन गेला. बारा तास वाळूचा ढिग रस्त्याकडेला पडून होता. पण एकही प्रशासकीय अधिकारी तिकडे फिरकला सुद्धा नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.