Latest Marathi News

BREAKING NEWS

 

लेंगरेवाडीत अडीच लाखाची जबरी चोरी : परिसरात चोरट्यांच्या दहशतीने नागरिक भयभयीत

0 1,352

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : लेंगरेवाडी येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम अशी एकूण २,६८,०००/- रुपयांची जबरी चोरी झाल्याची घटना आज दिनांक ०३ रोजी पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान घडली. याबाबत आटपाडी पोलिसात घटनेची नोंद झाली असून गुन्हा घडलेल्या ठिकाणी आय-कार व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

 


याबाबत अधिक माहिती अशी, लेंगरेवाडी येथे आनंदा बिरा लेंगरे यांचे घर आहे. दिनांक ०३ रोजीच्या रात्री २.३० ते ०३.१५ च्या सुमारास त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी उघडून १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १० ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, १२ ग्रॅम सोन्याची वजरटीक, 500 ग्रॅम चांदीचा करदोडा, 120 ग्रॅम चांदीची जोडवी, 330 ग्रॅम चांदीची इरुदया, मासोळ्या, पैंजण, हातातील दोन कडे,पाच ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, लहान मुलाच्या दोन अंगठ्या, गळ्यामध्ये घालण्याच्या सोन्याच्या दोन पेट्या, दोन पानाड्या,६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चार बदाम तसेच बेडरूममधील कपाटात ठेवलेली ८० हजार रुपये रोख रक्कम असा दोन लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.


या जबरी चोरीने लेंगरेवाडी परीसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोवस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.