Latest Marathi News

BREAKING NEWS

 

दि.बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न : सभासदांच्या सूचनांचा आदर करणार : अमरसिंह देशमुख

0 1,366

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : सभासदांच्या सूचनांचा आदर केला जाईल, याचबरोबर बँकेच्या कामकाजा विषयी ज्यांना काही सूचना असतील त्यांनी कधीही संचालक मंडळाला व मला सांगाव्यात. स्थापनेच्या दिवशी २० लाख रुपयांच्या ठेवी असणारी व आता पर्यंत ७४० कोटी रुपयांचा व्यवसाय तसेच भविष्यात एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचा बँकेचा मानस असल्याचे प्रतिपादन दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन अमरसिंह देशमुख यांनी बँकेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.

 


दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचीची २५ वी वार्षिक सर्व साधारण सभा जिम्नॅस्टिक्स हॉल येथे बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन जे.जे. देशपांडे, संचालक महीपतराव पवार, भाऊसाहेब गायकवाड, सावंता पुसावळे, सुर्यकांत दौंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आड्मुठे, उपमुख्यकार्यकरी अधिकारी श्री. सागर यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.


पुढे बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेची स्थापना झाल्यापासून बँकेला राज्यस्तरावरील १५ वा पुरस्कार मिळाला आहे. बँकेचे ७८४८ सभासद असून वार्षिक सभेला असणारे उपस्थित नसणाऱ्या सभासदाला बद्दल खंत व्यक्त करत यामुळे सहकार कसा टिकणार असा प्रश्न देखील त्यांनी केला. येथून पुढच्या काळात बँकेची १.५ टक्के पेक्षा जादा थकबाकी वाढू नये यासाठी कर्मचारी बरोबर संचालक मंडळाने देखील प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. बँकेचा व्यवसाय वाढला असून लवकर जिल्हातील जत तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे बँकेच्या शाखा सुरु होणार असल्याचे नमूद केले. बँकेने ठेवीचे व्याजदर वाढविले असून, कर्जाचे व्याजदर कमी केले असले तरी, सभासदांना मात्र १० टक्के लाभांश सातत्याने दिला असल्याचे सांगत, आटपाडी तालुक्यातील अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली पैशाला फसविले गेले असून, डाळींब पिकातून म्हणावे असे उत्पन्न न झाल्याने त्याचा परिणाम बँकेच्या व्यवसायावर झाला असल्याचे नमूद केले.


कर्मचारी यांचा पगार वाढ केल्याबद्दल चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला असला तरी, अधिकारी व कर्मचारी यांनी ठेवी, कर्जे व वसुली या त्रिसूत्रीवर काम केले तरच पगारवाढ शक्य असल्याचे म्हणत, येणाऱ्या काळात बँक ऑनलाईनच्या सेवा चालू करणार असून, त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. तसेच यापुढे हि संचालक मंडळ सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून बँकेचा कारभार करतील असा विश्वास देखील व्यक्त केला.


बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी बँकेची व्यवसायाबदल माहिती देत, येणाऱ्या काळात बँकचे संपूर्णपणे संगणकीकरण करण्याचे काम सुरु असून बँकेच्या व्यापारी पेठेतील शाखेमध्ये बँकेचे स्वत:चे एटीएम मशीन सुरु करण्यात आल्याचे सांगत यामध्ये सभासदांनी कितीही वेळ पैसे काढले तरी, कोणताही चार्ज लागणार नसल्याचे नमूद करत येथून पुढे सभासदांना कॅशलेस व्यवहार करता येणार असल्याचे सांगितले.


यावेळी वाहन कर्ज, मालमता तारण कर्ज, बचत ठेव कर्ज, व्यवसायिक कर्ज, शेती कर्ज विभागातील प्रातिनिधिक स्वरुपात कर्ज घेवून त्याची परतफेड करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.