Latest Marathi News

BREAKING NEWS

 

अंतरवाली, सराटी घटनेचा दिघंचीत निषेध : सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

0 1,611

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली, सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्यावर लाठीचार्ज करण्याच्या घटनेचे आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात

 


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी लोकशाही मार्गाने मनोज जिरांगे हे लोकशाही पद्धतीने आमरण उपोषणाला बसले होते. महाराष्ट्रातील युती सरकारने हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते युवक व महिला यांच्यावरती अमानुष लाठी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.


या घटनेचा आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. आटपाडी तालुक्यातील सर्व मराठा बांधव एकत्र येऊन मराठा आरक्षण प्रश्नावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून शासनाविरुद्ध लढा देण्याचे व मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीनेआटपाडी तहसील कार्यालय वरती भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्याचे ठरले असून यामध्ये मराठा समाज व मराठा समाजाला पाठिंबा देणारे इतर समाजातील सर्व संघटना यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.