माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील गुळेवाडी गावाचे सुपुत्र, गलाई व्यवसायिक हिंदुरावशेठ थोरात यांचे आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी वयाच्या ५३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन बहिणी, एक भाऊ, वडील असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ०३/०९/२०२३ रोजी दुपारी ० ४:०० वाजता गुळेवाडी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली असून, त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
हिंदुराव शेठ थोरात यांनी वयाच्या १६ व्या वर्षी गलाई व्यवसायामध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईची वाट धरली. त्यानंतर त्यांनी या व्यवसायामध्ये चांगलाच जम बसविला. गलाई व्यवसायातून त्यांनी त्यांनी आर्थिक सुबत्ता प्राप्त केल्यावर त्यांनी गावामध्ये अनेक सामाजिक कामे केली. याप्रमध्ये प्रामुख्याने त्यांनी गावातील असणारे मंदिरे दुरुस्ती करण्याबरोबरच अनेक नवीन मंदिरेहि बांधली. तसेच त्यांनी अनेक युवकांना व्यवसायासाठी पाठबळ देत प्रसंगी आर्थिक मदत देखील केली. त्यांच्या या जाण्याने गुळेवाडी गावासह झरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.