मुढेवाडी/रेश्मा राजगे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू होत असलेला अखंड हरिनाम सप्ताहला आज पासून सुरुवात झाली आहे.
वारकरी संप्रदायमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.
अखंड हरिनाम सप्ताह या कार्यक्रमाची रूपरेषा ही योग्य पद्धतीने पार पडत असते ते म्हणजे पहाटे चार ते सहा काकड आरती सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी पाच ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरी किर्तन आणि बारा ते चार हरी जागर या पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा पार पडत असते.
त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी दिंडी मिरवणूक सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडत असतो. दिंडी सोहळ्या दिवशी रात्री श्री कृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. व शेवटच्या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन झाल्यानंतर गोपाळकाला करून व महाप्रसाद घेऊन अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असतो.