माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : प्रतिनिधी : खरसुंडी येथे अज्ञात चोरट्याने तब्बल अंदाजे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना खरसुंडी-आटपाडी एस टी बस मध्ये घडली असून या प्रकरणी आटपाडी पोलिसात बस प्रवाशा सह आणण्यात आली असून या ठिकाणी बस मधील सर्व प्रवासी यांची कसून तपासणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, रत्ना पंडित जाधव (वय ६५) रा. कणकवली या त्यांच्या नातलग मंगळवेढा येथे आल्या होत्या. आज पोर्णिमा असल्याने त्या त्यांच्या पतीसह खरसुंडी येथे देवदर्शनाला आल्या होत्या. खरसुंडी येथून देव दर्शन करून त्या खरसुंडी-आटपाडी बसने (क्र.एम एच १४ बी टी २९००) आटपाडी कडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.
बस बसल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी बस वाचक-चालक यांना गंठन चोरीला गेल्याचे सांगत, बस कुठेही न थांबता आटपाडी पोलीस ठाणे येथे आणण्यात आली. यावेळी सर्व प्रवाशी यांची कसून चौकशी करण्यात आली. परंतु कोणत्याही प्रवाशांकडे चोरीला गेलेले दागिने सापडले नाहीत.