माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीचा भाजपचा उपसभापती रूपेश पाटील याला पोलीसांनी काल दिनांक २९ रोजी अटक केली असून न्यायालयात त्याला दाखल केला असता, न्यायालयाने त्याला आज जामीन मंजूर केला आहे.
सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या एका महिलेला त्यांच्या व्हाटसअप वरती हाय असा मेसेज अनोळखी व्यक्तीने पाठवला. सुरुवातीला अनिता पाटील यांनी याला रिप्लाय दिला नाही. परंतु सारखे-सारखे मेसेज आल्यावर त्यांनी त्यास रिप्लाय दिल्यावर त्याने सोशल मिडिया Instagram वर raj.iv4797 या अकौंट वरून मला तुमचा नंबर देण्यात आला असल्याचे सांगत अश्लील मेसेज केले.
याबाबत सदर अनिता पाटीलने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अधिक तपास केला असता तपासामध्ये भाजपचा आटपाडी पंचायत समितीचा माजी उपसभापती रुपेश पाटील याने त्याच्या स्वत:च्या मोबाइल वरून raj.iv4797 या नावाने Instagram वर अकौंट काढून त्या अकाऊंट वरून त्याने सदर अनिता पाटील यांचा नंबर दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे निष्पण झाले असून त्यांना याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी रुपेश पाटील यास अटक केली असून न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला आहे.
या बाबत या संपूर्ण प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी आज दुपारी पत्रकार परिषद या घटना क्रमाची संपूर्ण माहिती दिली.