Latest Marathi News

BREAKING NEWS

 

करगणी तळेवाडी रस्त्याप्रश्नी तळेवाडी ग्रामस्थांचं अनोखं आंदोलन : आमदार, बाबर, पडळकर याकडे लक्ष देणार का?

0 1,948

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : गेली दहा ते पंधरा वर्षे करगणी तळेवाडी रस्ता आज होईल उद्या होईल या प्रतिक्षेत असलेल्या तळेवाडी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांना वैतागून अखेर लोकप्रतिनिधींचे याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी अनोखं लक्षवेध आंदोलन केलं.

 


आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अनिल भाऊ बाबर दोघांनाही email text मेसेज what’s app मेसेज करत एक आगळं वेगळं ऑनलाईन आंदोलन करण्यात आलं.


करगणी तळेवाडी रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली असून सदर रस्त्यावरुन ये जा करणे म्हणजे तारेवरची कसरत बनलेली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असून प्रवाशांची तारांबळ उडत आहे. या प्रश्नी वारंवार आश्वासनांची खैरात केली गेली पण ती हवेतच विरली. सदर रस्त्याचे काम दोन्ही आमदारांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत चालू करावे अशी तळेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.


काय आहे मेसेजमध्ये
आदरणीय आमदार (खानापूर आटपाडी विधानसभा) श्री.अनिल भाऊ बाबर,
आदरणीय आमदार (विधान परिषद सदस्य) श्री. गोपीचंद पडळकर

आपणास कळविण्यात येते कि, मी तळेवाडी गावचा ग्रामस्थ, ता. आटपाडी,जिल्हा सांगली या गावाचा रहिवाशी असून, आपण माझ्या विधान सभा मतदार संघा चे गेली दहा वर्षे सलगपणे प्रतिनिधित्व् करत आहात. या मतदार संघातील अनेक विकास कामे आपल्या माध्यमातून पूर्ण झालीं आहेत आणि अजून हि होतील च्,.या बद्दल आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि असेल.
परंतु आमच्या गावाचातळेवाडी ते करगणी हा मुख्य रस्ता, गेल्या 15 वर्षांपासून अतिशय खराब आहे. थोडक्यात म्रुत्युचा जणू सापळा च बनला आहे. आणि हि गोष्ट अतिशय खेद्जनक् आहे. जीव मुठीत घेऊनच् तळेवाडीकर गेली अनेक वर्षे या रस्त्यावर प्रवास करत आहेत. रस्त्या मध्ये खड्डे इतक्या प्रमाणात आहेत, कि लोकांच्या पाठीचे दुखणे वाढत आहेत.
आमच्या गावातील पेशंट, गरोदर मातांना प्रवासच् करता येत नाही ,हि बाब अतिशय खेद जनक आहे. आणि एक तळेवाडीकर म्हणून आम्हाला या गोष्टीविषयी खूप वाईट वाटत आहे. गेली अनेक वर्षे आम्ही हा अन्याय सहन करत आहोत. या रस्त्या बद्दल अनेक अश्वासने दिली गेली. परंतु लोक प्रतिनिधी म्हणून आपण या कामासाठी प्रयत्न केले आहेत हि ,परंतु या कामासाठी वेग दिसत नाही. हे वास्तव आहे.
मी तळेवाडी चा सर्वसामान्य ग्रामस्थ आदरणीय अनिल भाऊ, आणि आदरणीय गोपीचंद शेठ आपणास नम्र विनंती करतो कि, आम्हा तळेवाडी करांच्या माहिती प्रमाणे, गेल्या कित्येक महिन्यापूर्वी हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन् मंजूर झाला आहे. या कामी आपलं हि मोठं योगदान आहे. आणि ते आपली जबाबदारी म्हणून असायला हि हवं….., परंतु प्रत्यक्ष कामास अतिशय विलंब होत आहे. परिणामी आम्ही सर्व तळेवाडीकर या रस्त्यावर प्रवास करताना अतिशय त्रस्त आहोत. येत्या दहा दिवसात या रस्त्याचे काम प्रत्यक्ष चालू व्हावं, यासाठी आपण प्रामाणिकपणे आपली जबाबदारी म्हणून प्रयत्न करावेत. अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधा मध्ये रस्ता कामी वेग वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहोत.
मी आपणास विनंती करतो कि, या तळेवाडी ते करगणी या रस्ता लवकरात लवकर सुरु व्हावा ,ज्या टप्प्या वर हे काम् थांबले आहे, ते पूर्ण करून या कामी गती द्यावी. आपण ते कराल हि अपेक्षा आहे.
आपलाच, तळेवाडी ग्रामस्थ

Leave A Reply

Your email address will not be published.