Latest Marathi News

BREAKING NEWS

 

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच अनिलभाऊ बाबर, आटपाडीच्या देशमुख दुध संघावर ; अमरसिंह देशमुख यांचा सत्कार केला सत्कार

0 2,488

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांच्या तर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कुष्ट नागरी पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल आमदार अनिलभाऊ बाबर यांनी बँकेचे संस्थापक चेअरमन अमरसिंह देशमुख यांचा बाबासाहेब देशमुख मिल्क प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी जावून त्यांचा सत्कार केला.

 


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांच्या तर्फे पुणे गटात २५० ते ५०० कोटी पर्यंतच्या ठेवी असणाऱ्या गटा मध्ये बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबईणे बँकेला दिले असून दिनांक २३ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या कार्यक्रमात सदरचा पुरस्कार दिला जाणार आहे.


बँकेला मिळालेल्या या पुरस्करामुळे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी बँकेचे संस्थापक चेअरमन व प्रमुख अमरसिंह देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी माजी जि.प. सदस्य अरुण बालटे, आटपाडी बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, माजी संचालक ऋषिकेश देशमुख, दिघंची ग्रामपंचायतीचे सदस्य मुन्ना तांबोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. २०१९ च्या विधानसभेला आमदार अनिलभाऊ बाबर हे बाबासाहेब देशमुख मिल्क प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी पाठींबा बाबत झालेल्या बैठकीला गेले होते. त्यानंतर प्रथमच या ठिकाणी गेल्याने तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.