माणदेश एक्सप्रेस न्युज : प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला. यामुळे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी लेंगरेवाडी ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळवली होती. सरपंच वंदना बजरंग लेंगरे यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये सरपंच वंदना बजरंग लेंगरे यांनी मनमानी केल्यास आरोप करत आठ ग्रामपंचायत सदस्यांनी आटपाडीचे तहसीलदार श्रीमती बाई माने यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.
आज या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात येणार होते. परंतु अविश्वास ठरावाच्या वेळी सरपंच वंदना लेंगरे ह्या हजर राहिल्या नाहीती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आठ विरुद्ध एक असा बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.